मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई राजवाडे यांना राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सन्मानित


भारतीताई राजवाडे सामाजिक कार्यकर्त्या जिल्हा रत्नागिरी,मुळगाव देवरुख,महाराष्ट्रात दहा वर्षे सातत्याने व सचोटीने सामाजिक बांधिलकीतून समाजकार्य करत असून शालेय गरजू विद्यार्थ्यांसाठी व आश्रम शाळा बालकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करते वस्तीगृहातील मुलींसाठी सॅनिटरी पॅड मोफत वितरण करणे त्याचबरोबर शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेच्या विकासाच्या प्रगतीसाठी रोख रक्कम स्वरूपात मदत करणे निरक्षर व्यक्तींना साक्षर होण्यासाठी मदत करणे. तथा पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील


असणे अशा विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव पाठीशी असल्याने सामाजिक कार्यकर्त्या भरतीताई राजवाडे यांच्या कार्याची दखल घेत आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी ध्येय फाउंडेशन तर्फे  पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच राज्यस्तरीय अग्निपंख  शैक्षणिक समूह २०२३ सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर साऊज्योती सामाजिक फाउंडेशनकडून राज्यस्तरीय आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. या  सर्वातून  प्रेरणा घेऊन  सामाजिक काम सातत्याने सुरू ठेवीन. समाजा प्रति आपलेही काही दायित्व असून त्याप्रती आपण सर्वांनीच निष्ठेने काम केले पाहिजे असं मत सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई राजवाडे 
यांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्...