मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्व,ग्रामीण भागातील  शाळा कॉलेज मध्ये जाऊन मुली व महिलांना स्व:स्वरक्षणाचे मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचे काम सातत्याने 12 वर्षापासून करत असताना त्याचबरोबर फेनशिंग (तलवारबाजी )आर्चरी , ज्युदो बॉक्सिंग अनेक इतर विविध शालेय खेळांमध्ये तालुकास्तरावर,जिल्हास्तरावर,राज्य स्तरावर दर्जेदार नामांकित खेळाडू तयार केले.

याच क्रीडा क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्कार देऊन देऊन अर्जुन  बाळासाहेब कळंबे यांना सन्मानित करण्यात आले.

अर्जुन  बाळासाहेब कळंबे यांचे अभिनंदन माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब
, यशराज देसाई दादा,मा.रविराज देसाई दादा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.अर्जुन बाळासाहेब कळंबे यांनी कार्यक्रमाचे आयोजक सचिन हळदे,राहुल निकाळजे, सत्यदिप खडसे,भारत हळदे, दिनेश गायकवाड, पवन शेळके यांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जुन बाळासाहेब कळंबे राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अर्जुन बाळासाहेब कळंबे सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावीव्यक्तिमत्...